गरीबी
चार लाकड तिने सारली
भल्या पहाटे शेगडी शिलगावली
जाडी भरटि भाकरी काळाकुट्ट चहा
रोजचाच दिनक्रम चालत असे हा
कधी शिळीभाकर आणि चटणी
तर कधी कधी नुसत्या कांद्या बरोबर वाटणी
मुलाच्या पुढ्यात ठेवले सारे
वाहु लागली स्वतः कामाचे भारे
दररोज न चुकता मुलाला शाळेत पाठवी
चार बुक शिकण्याचे सतत स्वप्न आठवी
ईतक्या गरीबीतही ती संस्कार करी
मोठा होउन मिळव बाबा प्रामाणिकपणाने भाकरी
तो शाळेत येइ अगदी नेमाने
कधी कधी विचलित होउ गेले
परीक्षा झाली पेपर वाटले गेले
शिक्षकांनी मुद्दाम उल्लेख करुन सांगितले
समतोल आहार म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर यानेच फ़क्त सुंढर लिहिले

<< Home