Wednesday, October 10, 2007

गरीबी

चार लाकड तिने सारली
भल्या पहाटे शेगडी शिलगावली
जाडी भरटि भाकरी काळाकुट्ट चहा
रोजचाच दिनक्रम चालत असे हा
कधी शिळीभाकर आणि चटणी
तर कधी कधी नुसत्या कांद्या बरोबर वाटणी

मुलाच्या पुढ्यात ठेवले सारे
वाहु लागली स्वतः कामाचे भारे
दररोज न चुकता मुलाला शाळेत पाठवी
चार बुक शिकण्याचे सतत स्वप्न आठवी
ईतक्या गरीबीतही ती संस्कार करी
मोठा होउन मिळव बाबा प्रामाणिकपणाने भाकरी

तो शाळेत येइ अगदी नेमाने
कधी कधी विचलित होउ गेले
परीक्षा झाली पेपर वाटले गेले
शिक्षकांनी मुद्दाम उल्लेख करुन सांगितले
समतोल आहार म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर यानेच फ़क्त सुंढर लिहिले

मी....आणि ती

बरसलो आज शब्दांतुन, तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन, तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन, तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून, तीने भाव माझा ना विचारला कधी.

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन, तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन, तीला उजेड माझा ना दिसला कधी.

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन, माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पाखरु बनुन, तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून, तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन, तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी.

काळ

वाईटच होता तो काळ
पडलो होतो मी रक्त बंबाळ
कसा बसा सुटुन अलो
मरायच होत तरी नाही मेलो

काही डिसत नव्हत
काही कळत नव्हत
डोळ्यांपुढे झाला अंधार
पेलवत नव्हता शरीराचा भार

शांतता पसरत श्र्वास थांबला
मेंदुला कळले की आता अंत आला
पन परत धावायला लागली जीवनसत्त्व
मरण पाहिल्यावर् कळल जीवनाच महत्व

अंधार बाहेर धकलत आला प्रकाश
डोळ्यांना डिसले ते निरभ्र आकाश
मेंदू जागा झाला क् क् र करु लागला
तो पण कामचोर डुडैवावर रडु लागला

पण आता शरीराला मरायच नव्हट
जीवनाच हे महत्व सांगितल्याशीवाय संपायच् नव्ह्त
तोंडाने ओरडुन सांगायचा प्रयत्न केला
पण निव्रुत्त मेंदुने आवाजाचा बहिशकार केला

ओरडल असत तरी
कुणी एइकायलाच नव्हत
सगळेच कामात डंग
कुणी लक्श देणारच नव्हत

शरीराचा निधार तुटला श्र्वासाचा आधारही सुटला
शेवटी जे व्हायच होत तेच झाल
हे रहस्य शरीरातच कोंडुन रहिल

आता काही घाई गडबड नव्हती
शांय्हता होती वायफ़ळ बडबड नव्हती
डोळ्याभोवति कळोख होत
डोळ्यात मात्र विलक्शण तेजाची झलक होती

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो

वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती

काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते

असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे

माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही