Wednesday, November 21, 2007

मातीच मागे राहणार आहे

आयुष्य शंभरिचे असले तरी.....मातीच मागे राहणार आहे
मी काय घेउन आलो होतो........काय घेउन जाणार आहे....
आयुष्य शंभरिचे असले तरी.......मातीच मागे राहणार आहे....

जमतिल सारे सवंगडी........अन्त्ययात्रा निघणार आहे......
ज्या खांद्यांवर हात टाकले.......त्या खांद्यांवर मी जाणार आहे......

ढालेल कोण अश्रु माझ्यासाठी......ते काय मी पाहणार आहे...??
स्वतःच अस्थी स्वतःच्या.........मी नदीत वाहणार आहे.....

आस मनात भेटीची........तशीच अजुन राहणार आहे......
मी जातो पहिला पुढे.......वाट त्यांची पाहणार आहे......

राहीली आठवण जर मनात.......पुण्यतिथि साजरी होणार आहे......
आयुष्य शंभरिचे असले तरी.......मातीच मागे राहणार आहे....

मोक्ष

मोक्ष म्हणजे नेमकं काय
मोक्ष म्हणजे नेमकं काय
मेल्यानंतरही कळालं नाही
चितेवर प्रेत धुसमुसतयं
पण, नीटसं ते जळालं नाही
अर्धा जळालो अर्धा उरलो
मोक्षासाठी भटकत राहिलो
स्मशानात पिंपळाच्या झाडावर
मग उलटा लटकत राहिलो
उलटं लटकूनही मला
खालचं जग सरळ दिसायचं
स्मशानात येणाऱ्या प्रत्येकावर
माझं मग बारकाइनं लक्ष असायचं
प्रेत उतरवताच खांद्यावरुनी
खांधेकरांना हायसं वाटायचं
गेलेल्या व्यक्तीच्या दु:खा पेक्षा
त्याचं ओझं जास्त वाटयचं
मग आपआपसात चर्चा सुरू व्यायची
माणुस मनानं हा खरा होता
हरामचा पैसा जरा जास्त खाल्ला
नाहीतर स्वभावानं बरा होता
चर्चा त्यांची चालू रहायची
विषयांचीही गर्दी वाढायची
चिता मात्र त्या ज्वलात
शेवटचं एकटीच लढायची
गर्दी निघून जायची, आणि
प्रेत राख होऊन मातीत मिसळायचं
मग एखादं अर्ध जळालेलं प्रेत
माझ्या शेजारी येवून लटकायचं

प्रेम हे माझे तुझे जुळलेच नाही

प्रेम हे माझे तुझे जुळलेच नाही
खेळ दैवाचे कुणा कळलेच नही
पाहिले रस्ते सुखाचे केवढे मी
पाय त्या वाटेवरी वळलेच नाही
झेलले छातीवरी मी वार सरे
वार पाठीवर कधी टळलेच नाही
मी कसे लपवून ठेवू दु:ख माझे
हुंद्क्यांना मी इथे गिळलेच नाही
मी तुझ्या प्रेमात या भिजलो असा की
प्रेत ही माझे कधी जळलेच नाही
तोडल्या त्यांनी कळ्या माझ्या सुगंधी
मग फुलांचे गंध दरवळलेच नाही
प्रेम हे माझे तुझे जुळलेच नाही..........
प्रेम हे माझे तुझे जुळलेच नाही
खेळ दैवाचे कुणा कळलेच नही
पाहिले रस्ते सुखाचे केवढे मी
पाय त्या वाटेवरी वळलेच नाही
झेलले छातीवरी मी वार सरे
वार पाठीवर कधी टळलेच नाही
मी कसे लपवून ठेवू दु:ख माझे
हुंद्क्यांना मी इथे गिळलेच नाही
मी तुझ्या प्रेमात या भिजलो असा की
प्रेत ही माझे कधी जळलेच नाही
तोडल्या त्यांनी कळ्या माझ्या सुगंधी
मग फुलांचे गंध दरवळलेच नाही